चुकीच्या गोष्टीची जाणिव करून द्यायला हवी

सिंधू पासून कन्याकुमारी पर्यंत जे जे येथे राहतात, ते सर्व हिंदू स्थानाचे हिंदू रहिवाशी.  राज्य का रण तुम्ही काही ही करा कारण कमरेच काढून माथ्यावर गुंडाळण्याची सवय तुमची राजकारण्यांची आमची भारतीयांची नाहीच मुळी. आजही एकमेकाच्या सुख दुःखात कोणी जात धर्म पाहून जात नाही. हि ह्या हिंदुस्थानची बलस्थाने आहेत. आणि मला वाटत ह्याचा आपल्या सर्वांना खात्रीने अभिमानच वाटत असावा.आज पर्यंतचा इतिहास पाहता ज्या ज्या वेळेस जनमानसात कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिमा मलिन झालेली असते तेव्हा तो प्रतिपक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो आणि मी किती स्वच्छ आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. जनतेने अशीच कायम आपली दिशा भूल करून घ्यावी का? . ह्यांना जर आपण नेते म्हणावे तर ,हे आपल्या राष्ट्राला कुठे घेऊन चालले आहे ?. स्वतःच स्वतःला अतिरेकी संबोधून आपलं राष्ट्र काय एक अतिरेकी राष्ट्र म्हणून जगासमोर आणायचे आहे काय?

(वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका शुद्धिचिकित्सकाचा वापर करून व/वा इतर प्रकारे सुधाराव्यात. त्याआधी लेखन प्रकाशित करण्यासाठी सुपूर्त करण्याची घाई करू नये : प्रशासक)