शेवयाचा उपमा - वरमीसीली.

  • २ वाट्या वरमीसीली - शेवया.
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  • १ मध्यम आकाराची शिमला मिरची
  • १/२ वाटी मटार
  • २ चमचे सांबार मसाला
  • २ चमचे तिखट
  • फोसणीचे साहित्य.
  • २ चमचे तूप
  • मीठ
१५ मिनिटे
४ /५ जण

शेवयाचा उपमा - वरमीसीली. 

प्रथम २ वाट्या शेवया २ चमचे तूप घालून भाजून घ्याव्या.

एकीकडे कांदा, धुतलेली शिमला मिरची व टोमॅटो बारीक चिरून ध्यावा.

नंतर कढई मध्ये फोडणीसाठी २ चमचे तेल घ्यावं, तेल तापल्यावर त्यात हळद आणि चिरून घेतलेली शिमला मिरची व टोमॅटो, कांदा, मटार घालावा, नंतर  त्यात चवीप्रमाणे तिखट घालावं व २ चमचे सांबार मसाला घालावा. झाकण ठेवून भाज्या ५ मिनिटे शिजू द्याव्यात. नंतर २ वाट्या पाणी व चवीप्रमाणे मीठ घालावं. उकळी फुटल्यावर भाजलेल्या शेवया घालाव्या. ३/४ मिनिटे झाकण ठेवावं.

नंतर छान ताटलीत खाण्यासाठी वाढावं, व सगळ्यांनी एकत्र बसून गरम-गरम स्वादिष्ट शेवयांचा आस्वाद घावा.  

जेवड्यास -तेवढं पाणी घालावं, जास्त पाणी घालू नये. म्हणजे शेवया छान मोकळ्या होतील. 

आवडत असल्यास स्वादासाठी, दाणे, गाजर, कोथिंबिर घालावी.  

मी.