अननस+ मध केक

  • पाक करून घेण्यासाठी- ४ टेबल स्पून मध, ४ टेबल स्पून पाणी, टिंड अननसातला ३ टेबल स्पून पाक
  • बेससाठी- २५० ग्राम बटर
  • १५० ग्राम साखर
  • ५० ग्राम मध
  • १/२ चहाचा चमचा संत्र्याची किसलेली साले,पाव कप अननसाचा रस. तो नसेल तर ऑरेंज ज्यूस
  • २५० ग्राम मैदा
  • १५० ग्राम बदाम पावडर
  • ५ अंडी
  • ४ च. चमचे बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ
  • टिनमधील अननसाच्या चकत्या
२ तास
१४ तुकडे


  1. टिनमधील अननस चाळणीवर टाकून कोरडा करून घ्या. पाकासाठीचे सर्व साहित्य म्हणजे मध, अननसाचा पाक आणि पाणी एकत्र करून दाट करा व वेगळे ठेवून द्या.
  2. प्रत्येक अंडे वेगळे फेटून घ्या आणि एका वाडग्यात जमा करा.
  3. बटर भरपूर फेटा. साखर घालून फेटा, चिमूटभर मीठ आणि संत्र्याची किसलेली साले व ५० ग्राम मध घाला आणि फेटा.
    ह्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला आणि परत एकदा भरपूर फेटा.
  4. मैदा+ बेकिंग पावडर+ बदाम पावडर एकत्र करा व ती वरील मिश्रणात घालून थोडे फेटून मिश्रण एकसारखे करा. आता यात अननसाचा किवा संत्र्याचा रस घाला.
  5. टिनमधील अननस चकत्या केकमोल्डच्या तळाशी लावा, चकत्यांमधील भोकांत व उरलेल्या जागेत करून ठेवलेला पाक घाला. ह्यावर केकचे मिश्रण पसरा.
  6. १७० अंश से. वर अवन प्रिहिट करून घ्या
  7. १७० अंश से वर ६० ते ७० मिनिटे बेक करा.
  8. केक झाला की नाही ते नेहमीप्रमाणेच विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहा.
  9. अवनचे दार उघडून केक अवन मध्ये तसाच पाच मिनिटे ठेवा, नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा.
  10. आता केक जाळीवर उलटा करून काढा. म्हणजेच खालचा भाग वर येईल आणि अननस चकत्या पृष्ठभागावर राहतील.
    केक पूर्ण थंड झाला की कापा आणि कापताना एका तुकड्यावर अननसाची अर्धी चकती येईल असे पाहा.
  11. व्हिप्ड क्रिम घालून खा.


आपण फारच हेवी खातो आहोत असे वाटले तर अपराधीपणाची भावना घालवण्यासाठी नंतर तासभर पळायला जा. :)

त्सेंटा आजी