बिनामैद्याचा संत्रा केक

  • ३ टेबल स्पून बटर
  • १/४ कप साखर+२ टीस्पून मध
  • १/४ कप सोअर क्रिम
  • १/४ कप ऑरेंज ज्यूस
  • २ टीस्पून संत्र्याची किसलेली साल
  • २ अंडी
  • ३ कप बदाम पावडर
  • १ टी स्पून बेकिंग पावडर
  • १ चिमूट मीठ
१ तास
१०-१२ तुकडे

बटर पातळ करून घ्या.
त्यात साखर घाला व फेटा.
अंडी वेगळी फेटून घ्या व ती त्यात घाला.
मध, सोअर क्रिम, संत्र्याच्या साली घाला व फेटा.
ऑरेंज ज्यूस घाला व फेटा.
बदाम पावडर व चिमूट भर मीठ घाला आणि मिश्रण एकत्र करा.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.

नेहमीसारखेच- केक बेक झाला की नाही ते सुरी घालून पाहा. अवनचे मध्ये ५ मिनिटे तसाच ठेवा व नंतर जाळीवर काढून घ्या.
पूर्ण गार झाला की कापा.

केकची आवड