रंगोत्सव अंतर्गत कुसुमांजली - काव्य, चित्र, कॅलिग्राफ़ी स्पर्धा + सांस्कृतिक कार्यक्रम

२०११-१२ हे कुसुमाग्रज ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष!


२६ फेब्रु. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, २७ फेब्रु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व आपला सर्वांचा लाडका मराठी भाषा दिन!


ह्या
दोन्ही सुवर्णदिनांचे औचित्य साधून " थर्ड बेल एंंटरटेनमेंट " (Third Bell
Entertainment) सादर करीत आहे " रंगोत्सव " (पर्व पहिले) - कविवर्य
कुसुमाग्रजांवर आधारित साहित्य, काव्य, नाट्य, कला, चित्र, संगीत,
नृत्य यांचा संमिश्र आविष्कार " कुसुमांजली " - २ दिवसांचा आनंदोत्सव!!!

प्रदर्शनाचे ठिकाण :

दि. २६ फेब्रु., दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे


महोत्सवाचे ठिकाण :

दि. २६ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे, टिळक स्मारक मंदिर, पुणे


महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता.


(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे)


- महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये -


१) कुसुमाग्रजांच्या १०० कवितांवर आधारित पेंटिंग, कॅलिग्राफी ह्यांची स्पर्धा व त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन.


२) प्रेम, मायमराठी, क्रांती, सामाजिक टीका ह्या विषयांवर आधारित काव्य स्पर्धा.


३) पेंटिंग, कॅलिग्राफी, फाँट, स्कल्पचर, काव्यवाचन यांवर आधारित डेमो प्रेझेंटेशन/वर्कशॉप्स.


पेंटिंग: श्री. रवी परांजपे.

कॅलिग्राफी: श्री. अच्युत पालव.

फाँट: सौ. अर्चना लोथे

काव्यवाचन: सौ. मंजिरी जोशी.  


४) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या कवितांवर/ साहित्यावर आधारित काव्यवाचन व अभिवाचनाचा कार्यक्रम.


५) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या गाण्यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम.


६) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील निवडक प्रसंगांचे सादरीकरण.


७) मराठी भाषा विषयावर परिसंवाद व चर्चासत्र.


८) पारितोषिक वितरण समारंभ.


महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता.

(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे)


चित्रकला,
सुलेखन व कविता स्पर्धा ह्यांचे फॉर्म्स व अटी मिळविण्यासाठी खालील ई-मेल
वर ई-मेल पाठवावा! आम्ही आपणांस लगेचच फॉर्म पाठवू.

ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील दुव्यावरून फॉर्म डाउनलोड करूनत्यावर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्यातारखेपर्यंत आपल्या चित्र/कॅलिग्राफी/कवितेसोबत आणून
द्यावा
दुवा
दुवा क्र. १


tberangotsav@gmail.com


अधिक माहिती साठी : www.thirdbellentertainment.com


धन्यवाद,


प्रज्ञा रास्ते.

*प्रशासक ह्यांसः स्पर्धेच्या एंट्रीज घेण्यास सुरुवात झालेली असल्याने मी कार्यक्रमाची तारीख आजपासून ठेवली आहे.