संत्रा केक

  • २०० ग्राम मैदा+१ चिमूट मीठ+ १.५ च. चमचा बेकिंग पावडर
  • १२५ ग्राम साखर
  • ४ अंडी
  • १ च. चमचा ऑरेंज इसेन्स + १ चमचा संत्र्याची किसलेली सालं.ऑरेंज इसेन्स नसेल तर २ चमचे संत्र्याची किसलेली सालं
  • पाव कप ऑरेंज ज्यूस
  • टिनमधील संत्री २५०-३०० ग्राम- ही संत्री साखरेच्या पाकातली असल्यामुळे साखर कमी घाला.
  • ही संत्री उपलब्ध नसतील तर फ्रेश संत्री सोलून घाला पण साखर १५० ग्राम घाला.
१ तास
१४-१५ तुकडे

  1. संत्री चाळणीवर घाला. जास्तीचा पाक निथळू
    दे. पण यातला पाक जरा घट्टच असतो, टिण्ड
    पाइनॅपल
  2. इतका पातळ नसतो त्यामुळे सगळा पाक निथळला जात
    नाही.
  3. बटर फेटून घ्या, साखर घालून फेटा.
    अंडी फोडून घाला, संत्र्याची साले व इसेन्स घाला आणि फेटा. मैदा+
    बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करा आणि ते थोडे थोडे वरील मिश्रणात घाला. मिश्रण
    एकसारखे झाले की त्यात संत्र्याचा रस घाला.
  4. केक मोल्डला बटर लावून घ्या. त्यावर हे मिश्रण
    घाला, त्यावर संत्री घाला.
  5. पाकातली
    संत्री जड असतात त्यामुळे ती वर न राहता केकच्या आत व तळाशी जातात.
  6. प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से ला ३० ते ३५
    मिनिटे बेक करा.  
  7. नेहमीप्रमाणेच- केक झाला की
    नाही ते केकमध्ये सुरी घालून पाहा. जरी केक झाला असला तरी तो अवन मध्ये
    तसाच ५ मिनिटे राहू द्या. नंतर बाहेर काढून ठेवा व अजून पाच मिनिटांनी
    जाळीवर काढा, गार होऊ द्या, नंतर तुकडे करा.

वैधानिक इशारा- ऑरेंज केकच्या टेम्टिंग वासाने केक पूर्ण गार होण्याची वाट न पाहताच स्लाइस करून खाण्याचा धोका आहे,:)

केक करण्याची आवड