रावण पिठले.

  • चण्याचे पीठ १ वाटी
  • तेल एक वाटी
  • लसूण ७-८ पाकळ्या
  • तिखट अर्धी वाटी
  • पाणी ४ वाट्या.
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर शोभेकरीता.
३० मिनिटे
आवडले तर एकालाही कमीच.

चण्याचे पीठ, तिखट, मीठ पाण्यात मिसळून, एकजीव करून ठेवा. (गुठळ्या राहाता कामा नये).
लसूण पाकळ्या सोलून चॉप करून घ्या. (गव्हा एवढे बारीक तुकडे करून घ्या)
कढईत तेल तापवा. तेल तापले की त्यात चॉप केलेला लसूण टाकून चांगला लाल होईपर्यंत तळून घ्या. आता गॅस बारीक करा. 
आता त्यात चण्याचे पीठ, तिखट आणि मीठ मिसळलेले पाणी हळूहळू ओता. एका हाताने ढवळत राहा.
पिठले घट्ट होऊन तेल सूटू लागले की गॅस बंद करून, वरून कोथिंबीर भुरभुरा (पिठल्यावर).

रावण पिठले तयार.

शुभेच्छा......!

हे पिठले जोंधळ्याच्या गरम गरम भाकरी बरोबर मस्त लागते.
सोबत बुक्की मारून फोडलेला कांदा विसरायचा नाही.

महत्त्वाचेः
मुळव्याध पेशंटांनी ही पाककृती 'वाचूही' नये.