तुझी माझी कहाणी ...!

तू निशा, तू चांदणी, तू रातराणी,

पेरिली ओठांत माझ्या तूच गाणी ...!
      
      रंग भरले हे कुणी मेघांतरी,
     पावसांतून अक्षतांची देववाणी ...!
हे कितीसे राहिलेले श्वास माझे?
गुंफुदे सारे तुझ्या श्वासांत राणी ...!
     तू नको बोलूस शब्दातून आता
     ऐकतो आहे तुझी मी देहवाणी ...!
हा तुझा की स्पर्श झाला मोगऱ्याचा?
दरवळे देही तुझी माझी कहाणी ...!