पाऊस आणि ती


पाऊस आणि ती

पावसाच्या सरींमध्ये
      माझे मन भिजून जाते,
तुझा विचार येताच
     तेच विश्व होऊन जाते.

पावसाच्या सरी जणू
     अलगद अंगावर येतात
स्वत:च्या गरव्याबरोबर
     आठवण तुझी करून देतात

पावसाच्या ओलाव्यात
     मन तुझ्याबरोबर फिरत असते
तुझे आणि माझे विश्व
     जणू भरभरून दाखवत असते

आठवणींचे हे जग
     किती दिवस चालत राहणार
तुझ्याशिवाय माझे मन
      नाही दुसरीला जागा देणार

मातीच्या दरवळलेल्या सुगंधात
     मानाने आकाशात उंच उंच उडावे
तू आणि मी दोघं
     एकमेकात मुक्तपणे हरवावे

तुझा तो एकमेव कोमल स्पर्श
    मनात घर करून राहतो
तुझ्या विचारांमध्ये
    मनाला कविता करायला लावतो.