जपानची होऊ घातलेली क्रांती

 "जमिनीत आणि यंत्रांवर  राबणारे हात क्रांती घडवू शकतात आणि युद्धात लढणारे हात स्वातंत्र्य मिळवून देतात त्यांमुळे कष्टाला आणि लढायला मागे राहू नका" असं लहान असताना वडीलधाऱ्या मंडळींकडून सांगण्यात येई.  कष्टाने विषम परिस्थितीवर मात करून उत्कर्ष कसा साधता येऊ शकतो याचे जपान जगाला नेहमीच उदाहरण संबोधीत करत आलेला आहे आणि राहीलदेखील. भूकंपामुळे उध्वस्त झालेला जपान पुन्हा एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठाकला आहे, असां माझा आशावाद आहे.

या क्रांतीची धग अणुभट्यांच्या उत्सर्जनापेक्षा विस्तारशाली असेल.  जपानची ही क्रांती , भारतासारख्या अस्ताव्यस्तता,  बेफिकिरी,  मानसिक गुलामगिरी- बाबुगिरी,  लाल फिताशाही,  सामाजिक असमतोल, भ्रष्टाचार,  वाढता स्वार्थीपणा-उपभोगवाद,  अमेरिकेचे अंधानुकरण या आणि अशा अनेक विवंचनांचा हवाला देत रडणारी मिडिया,  त्यांना भर देणारे प्रचंड मनुष्यबळ असणाऱ्या देशाला काही अंशी तरी प्रेरणा देणारी ठरेल असाही माझा एक आशावाद आहे.

जपानच्या होऊ घातलेल्या क्रांतीला माझ्या मन:पुर्वक सदिच्छा ! ब्रेव्हो जपान!

-जयेश निमसे
फाल्गुन पौर्णिमा (होळी)