मेधा पाटकर बुध्दिभेद करीत आहेत का ?

            नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात मत मांडले की, फाशीची शिक्षाच असू नये. फाशीमध्ये  क्रूरता आहे.

          प्रश्न कसाब व अफजल गुरु यांच्यासंदर्भातील होता.
          पाटकर यांचा विचार सरळ अहिंसावादी आहे.   
          या दोन्ही दहशतवाद्यांव्यतिरिक्त इतर देशांतर्गत गुन्हेगारांसंदर्भात (दरोडेखोर, भ्रष्ट अधिकारी इत्यादी) हे मत व्यक्त केले असते तर त्याचा सहिष्णुतेने विचार झाला असता. या दहशतवाद्यांबाबत प्रकरण पूर्ण भिन्न आहे. त्यांनी साधा गुन्हा केलेला नाही. देशावर हल्ला केला आहे.या दोन्ही गुन्हेगारांना फाशी द्यावी, या मताचा जवळजवळ पूर्ण देश आहे. अपवादाने दुमत असेल. 
इतक्या महत्त्वाच्या गुन्ह्याबाबत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलेले विचार योग्य आहेत का ?
विचारस्वातंत्र्य म्हणून या मताकडे दुर्लक्ष करावे का ?
पाटकर देशातील नागरिकांचा बुध्दिभेद करीत आहेत का ?