ऑगस्ट १० २०१९

जॉगिंगचा अड्डा

आजकाल जॉगिंगच्या अड्ड्यावरयोगिच योगी दिसतात
मोठमोठे आवाज काढूनते प्राणायाम करतात..........................धृ.

काही तर पोट हालवून अह्म ब्रह्म" म्हणतात
ओमकाराच्या नावाने ते मुल्लासारखी बांग देतात

काही डोळे मिटून ध्यान करीत बसतात
आकाशाला गवसणी घालण्याचाप्रयत्न ते करतात

काही 'सुकट' म्हातारे हाफ चड्ड्या घालतात
शीर्षासनात हळूच तेकपल कडे बघतात

कधी एखाद जमाव येतो राक्षसासारखा हासतो
हसणारे ते सारे शहाणे आत मात्र रडत असतात

काही असेच शिष्ट येतात कपल जवळ थांबतात
समाजस्वास्थ्य बिघडू नये म्हणून पोलिसांना बोलावतात

पोलिस येईपर्यंत ते जिभल्या चाटित पाहतात
पोलिस आल्यावर मात्र ते काढता पाय घेतात

व्यायाम करणारे तर कहरच करतात
चक्राकार फिरून ते वाकडे वाकडे होतात

माझ्या मनात विचार येतो हे असेच अडकले तर ?
पोरं बाळं दात काढतील बायका त्यांना बाहेर काढतील

कधी कधी धमाल येते रामायणाचा पाठ चालतो
प्रवचन करणारा भय्या अध्यात्माच्या गोष्टी करतो

घरी गेल्यावर सुनेला छळतो शिस्तीचे धडे देतो
राज्यावर बसल्यासारखा घरात तो बसून राहतो

असे एक स्वीमर आजोबा जंपिंग बोर्डावर बसले
तिथेच योगासने करताना ते तलावात पडले

अचानक पडल्याने तिथेच प्राण गेला
म्युन्सिपालिटीने मग गळ लावून काढले

अड्डा गढूळ झाला शोकसभा झाली
सारे "शिष्ट" जमले अन गळा काढून रडले(पूर्व प्रकाशनः मीमराठीं. नेट/नोड/५५६०)

Post to Feed


Typing help hide