मसाला (स्टफ्ड) भाकरी

  • ज्वारीच्या भाकरीचे पीठ (किंवा तयार भाकरी)
  • कांदा, भाजलेला पापड, तिखट, मीठ, दाण्याचे कूट, थोडी चिरलेली कोथिंबीर (ऐच्छिक)
  • १ मिरची बारीक चिरलेली , तेल
१० मिनिटे
१ जण

प्रथम एक चांगली गोल, खरपूस, पापुद्रे सुटलेली भाकरी बनवून घ्यावी!

भाजलेल्या पापडाचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, तिखट-मीठ, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, तेल सगळे एकत्र कालवून घ्यावे. भाकरीचा एक पदर बाजूने थोडा फाडून त्यात हा मसाला आतपर्यंत सारावा. पुन्हा तोंड बंद करून तव्यावर चमचाभर तेल टाकून भाकरी  पुन्हा शेकून घावी. लगेच ताटलीत काढून खायला घ्यावी.

उन्हाळ्यात भाज्या अगदी नकोशा वाटतात... त्यावरचा उपाय!

(आणि सॅलड प्रेमी त्यात गाजराचा कीस, कोबीचा कीस, पालक बारीक चिरुन, मुळ्याचा कीस... काय वाट्टेल ते टाकू शकतात.. )

स्वतः