वसंत काव्य कट्टा

मित्रहो,
वसंत बहरला पानोपानी ।
लाली धरली गुलमोहरांनी ।।

कंठ आला कोकिळेला ।
रुंजलेकवि शब्द गंधाला ।।

कविराजांनो अणि राणींनो,
आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्....

आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण -
आपण फक्त इतकेच करायचे आहे -
जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा -
जेणे करून आपला परिचय त्यात व्हावा.
जसे आपले, आपल्या आई- वडिलांचे, पती किंवा पत्नीचे (विवाहित असल्यास ) नाव,
जन्मदिनांक, वार, महिना, साल, भावा-बहिणींची मुलाबाळांची संख्या - (नावे
नकोत), आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदीचा उल्लेख काव्यमयरित्या केला गेला
असावा.
वर्णन स्वतःचे असावे. म्हणजे त्यातील कथन कट्टयावरील मित्रपरिवारात व्यक्ती परिचयात कामाला येईल.
काव्यकुसुम कट्टा सर्वांच्या सोईने पुण्यात करायची कल्पना आहे.
कविवर्यांच्या खिशाची कल्पना असल्याने आपल्या खिशाला फार ताण पडणार नाही.
त्याची चिंता नको.
विदेशातील मित्र परिवारांनी देखील यात सामील व्हावे. त्यांनी स्काईप किंवा
अन्य नेटच्या साधनांनी कट्ट्यावरील मजा - गप्पाटप्पांत सहभागी व्हावे अशी
विनंती.
विशेष सूचना - "नाडी" हा विषय आऊट ऑफ बाऊंड ठेवला जाईल.
शशिकांत ओक.

चहा व अन्य डीशची सोय ही झाली आहे. तेंव्हा बिगीबिगी यावे. कारणे असतील तर
बाजूला ठेवून रविवारी सायंकाळी ५पर्यंत हजेरी लावावी. ही विनंती.
आपण येत असल्याची वर्दी आधी मला ९८८१९०१०४९ वर दिलीत तर आनंद वाटेल.
आपला नम्र,