भाजप ते शिवसेना

नारयण राणेंनी शिवसेना सोडणे हा एक फार पूर्वी पासून चालत आलेल्या खेळातील एक भाग आहे. शिवसेना प्रमुखांना जेव्हा "हिंदू हृदय समराट" होण्याची स्वप्ने पडली तेव्हांच शिवसेनेचा अंत अटळ होता.


त्यावेळेस महाराष्ट्रात शिवसेना हाच एक पक्ष संघटीत होता. भाजपाला महाराष्ट्रात फार थारा नव्हता. काँग्रेस मध्ये पूर्ण टाईम पास चालू होता. फक्त शिवसेनाच एक पक्ष होता जिथे कोणाचा तरी वचब होता. त्यात शरदरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंग फुंकले ...


राष्ट्रवादीचा उदय भाजपाच्या पथ्यावर पडला. एकीकडे पवारांबरोबर गनीमी कवे करून शिवसेना / काँग्रेस मध्ये खिंडारे पाडायची व दुसरीकडे शिवसेना / काँग्रेस मधील नादान नेत्यांना नादाला लावायचे. सर्वोत्तम व्यक्ति म्हणजे बाळासाहेबच. तसे बाळासाहेब पहिल्यापासूनच उठसूट बोलणारे, ते भाजपाच्या "हिन्दुत्वाच्या" गेम मध्ये फसले! भाजपाचा हा गेम म्हणजे "स्वातंत्रसैनिक व्हावातर दुसऱ्याच्या घरात"! मग उत्तम सैनिक कोण, तर शिवसैनिक आणि सर्वोत्तम कोण तर त्यांचा राजा! भाजपाजर हिन्दुत्वाचा प्रचार करते तर हिन्दु हृदय समराट शिवसेनेत कशाला!


... तिथे बाळासहेब खरे फसले ...


काळ गेला तसे बाळासहेब फसत गेले, खुद्द बाळासहेबांच्या हे कधीच लक्षात आले नाही. सुरुवातीला हे हिन्दुत्वाचे लेबल गोंडस होते. पण अचानक भाजपाने कोलांटीउडी मरली. तो पर्यंत राष्टवादीच्या मदतीने लचके तोडणे चालूच होते ...


भाजपाही एक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्याकडे हिन्दुत्व सोडून आजून चिकार रंग होते बदलण्यासाठी; पण वाघाकडे फक्त मराठमोळ्या मातीचा रंग व (नव) भगवा रंग होता. नव भगवी वस्त्रे चढवताना मराठी माती पडून गेली, हरवली. वाघाला भगवी वस्त्रे उतरवण्याचा विचार देखिल आला, पण माती काही परत चिकटेना. वाघ उघडा पडला ... लाज राखण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू झाला ... चालू आहे ...


त्या उलट दाक्षिणात्य / बंगाली / गुजराती चाणक्य मंडळी. द्रमुक असो वा आण्णांचे द्रमुक वा तेलगू देसम आसो. त्यांनी आपले राज्य कधीच सोडले नाही. परंतु राज्याच्या राजधानीत बसून राष्ट्रची राजधानी चालवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. हे बाळासहेबांना देखिल करता आले असते. पण विनाषकाले विपरीत बुद्धी! आणि राज्यस्तरावर राहून सुद्धा दक्षिणेकडील पंतप्रधान पहायला मिळाले, ५० वर्षे उलटली तरी मराठी पंतप्रधान काही पहायला मिळाला नाही!


... आता जे काय घडतयं ते घडू द्या. पण त्याच बरोबर नव शिवसेनेचा जन्म होवू द्या ... पण ही शिवसेना फक्त महाराष्ट्रापुर्ती मर्यादित असूद्या ...