दिल्लीपेक्षा राज्य प्रिय का ?

     हा प्रश्न विशेषत्वाने मराठी खासदारांसंदर्भात आहे. इतर राज्यांतील खासदारांबाबत कल्पना नाही. 

      खासदारकीत  अधिक वरिष्ठ पातळीवर जाण्याची संधी मिळते. अधिक ओळखी होतात. एका पूर्ण मतदारसंघावर लक्ष देण्याची संधी असते. तरीही, मुख्यमंत्रीपद वा उपमुख्यमंत्रीपद काही वर्षे उपभोगून दिल्लीत गेलेल्या मराठी खासदारांचे लक्ष राज्यातच असते, असे वाटते. मतदारसंघ म्हणून एका शहरावर किंवा शहरातील भागावर नियंत्रण मिळविण्यापेक्षा मोठ्या राज्याचे नेतृत्व करण्यात जास्त भूषण आहे, असे आहे का ?