जुलै ११ २०११

काही तीव्र ... ... मंद्र काही या माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन

१३/०७/२०११ - सा. ७:३०
१३/०७/२०११ - रा. ९:००
प्रदीप वैद्य या प्रायोगिक रंगभूमीवरील नाट्यकर्मीने लिहिलेल्या मुक्त कवितांचा
संग्रह ..

काही तीव्र ...

... मंद्र काही

हा अमलताश प्रकाशनतर्फे येणारा नवा मराठी कवितासंग्रह श्री. सचिन खेडेकर
यांच्या हस्ते बुधवार, दिनांक १३ जुलै २०११ रोजी प्रकाशित होत आहे.

या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ स्वप्नाली ठकार यांचे असून कवितांसोबतची रेखाचित्रे
आनंद चाबुकस्वार आणि जुई कुलकर्णी यांची आहेत.

प्रदीप वैद्य यांच्या ब्लॉगवरील कवितांमधून संकलित केलेल्या या पुस्तकाचा
प्रकाशन सोहळा पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे संपन्न होईल.

प्रकाशनानंतर सचिन खेडेकर या संग्रहातील काही निवडक कवितांचे अभिवाचन करतील.

बुधवार, दिनांक १३ जुलै २०११, सुदर्शन रंगमंच सायं ७.३० वाजता.

पुस्तकासाठी संपर्क : (प्रकाशक) सुश्रुत कुलकर्णी ९८२२५ २२४७५

Post to Feedशुभकामना -

Typing help hide