जुलै २१ २०११

ढक्कू

जिन्नस

  • अर्धी वाटी तूरडाळ शिजवलेली
  • लाल तिखट पाव चमचा , धनेजिरे पूड पाव चमचा, मीठ, लिंबू अर्धे, छोटा गुळाचा खडा
  • वांगे, भोपळा, फ्लॉवर, मटार, फरसबी, सिमला मिरची, पालक
  • कांदा, टोमॅटो, मिरच्या
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद,

मार्गदर्शन

वर दिलेल्या सर्व भाज्या मध्यम आकारात चिरा. या सर्व भाज्यांच्या फोडी २-३ वाट्या. तुरीची डाळ शिजवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेली मिरची, कांदा, टोमॅटो व पालक घालून थोडे परता. नंतर सर्व भाज्यांच्या फोडी घाला व परता. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून भाज्या परताव्या. अगदी थोडे थोडे पाणी घालून वाफेवर भाज्या शिजवा. त्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड घाला व चवीपुरते मीठ घाला. नंतर शिजवलेले तुरीच्या डाळीचे वरण डावेने एकजीव करा व त्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घाला व थोडे लिंबू पिळा. हे सर्व मिश्रण शिजवलेल्या भाज्यांमध्ये घाला व पाणी घाला. उकळी येऊ दे. नंतर त्यात अगदी छोटा गूळाचा खडा घालावा. भाज्या कच्या नकोत पण खूप शिजलेल्याही नकोत. एक दणदणीत उकळी आणा. गरम भाताबरोबर ही भाज्या घातलेली आमटी खूप छान लागते. सर्व भाज्यांची चव छान लागते.

मी यामध्ये इथे मिळणारे सर्व भोपळे घातलेले आहेत. zucchini, yellow, butternut squash

आई,आजीची रेसिपी : भाज्या :  बटाटा, कांदा, हिरवे टोमॅटो, वांगे, भोपळा, शेवगा शेंगा, चिंच गुळाचे दाट पाणी, खवलेला ओला नारळ व कोथिंबीर. या आमटीला कोकणात ढक्कू म्हणतात.

टीपा

ही आमटी गरम गरम प्या अथवा गरम भाताबरोबर खा.

माहितीचा स्रोत

स्वानुभव, आईआजीची रेसिपी

Post to Feedपाककृती
छान

Typing help hide