ऑगस्ट २२ २०११

मनोगत दिवाळी अंक २०११

नमस्कार,

दिवाळी अंकसमितीमधील सहभागासाठी आवाहन पाठविण्यास थोडा उशीरच होत आहे. ह्यावर्षीच्या दिवाळी अंकाची तयारी आता सुरू करायला हवी आहे. नेहमीप्रमाणेच दिवाळी अंकासाठी समिती स्थापन करायची आहे.

मनोगताच्या २०११ च्या  दीपावली अंकाच्या निर्मितीस हातभार लावण्याची इच्छा असणार्‍या सदस्यांनी कृपया दिवाळीमनोगत ह्यांना  व्यक्तिगत निरोप लिहावा आणि त्यात आपण कोणत्या स्वरूपाचे साहाय्य करू इच्छिता हे नमूद करावे. कामाची विभागणी साधारण खालीलप्रमाणे असेल :

  • तांत्रिक - ड्रूपल, HTML, वेब डिझाइनिंग/टेस्टिंग/पब्लिशिंग, ग्राफिक्स
  • मुद्रितशोधन, शुद्धलेखन तपासणे इत्यादी
  • संपादन साहाय्य
  • पडद्यामागील सुसूत्रता, फाईल मॅनेजमेन्ट, विरोप-पत्रव्यवहार, समिती सदस्यांतील, व समिती व लेखकांतील समन्वय इत्यादी
विभागणी काटेकोर नसून सदस्य एकाहून अधिक विभागास हातभार लावू शकतात. इच्छुक सदस्यांनी कृपया आपले निरोप लवकरात लवकर, शक्यतो ५ सप्टेंबरपर्यंत पाठवावे.

अंकसमितीचे काम मनोगत सदस्यांना साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यापासून होत असले तरी अंक प्रकाशित होण्याच्या सुमारे महिनाभर आधी (ह्यावर्षीसाठी सुमारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढे) समितीचे मोठ्या प्रमाणात काम वाढते. साहित्य पाठविण्याच्या मुदतीच्या अखेरीस साहित्याची आवक मोठ्या प्रमाणात होते, तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर निवडलेले साहित्य तपासून अंकावर चढवणे ह्या मुख्य दोन गोष्टींसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते.

लेखकांनी आणि कवींनीही 'मनोगत दीपावली अंक २०११' साठी  आपले उत्तम लिखाण राखून ठेवावे, ही विनंती.

आपले,
दिवाळीमनोगत

Post to Feed

सदस्यांना विनंती
ह्यावर्षीचा दिवाळी अंक रद्द
फेरविचार
कथा, कविता आणि लेख
मी पाठवलेले साहित्य
दिवाळी अंक मुदत
पाककृती
दिवाळी अंकाचे बाड प्रशासनाकडे आलेले आहे.
मा. प्रशासक
बाड म्हणजे ...
दिवाळी अंक प्रकाशित
दिवाळी अंक २०१०चा दुवा?
दिवाळी अंक २०१०चा दुवा

Typing help hide