हट्ट गणेशबाळाचा..

हट्ट गणेशबाळाचा..

गणेशबाळाचा आईकडे हट्ट
मलाही "सेल" हवायं गं मस्त

"चारी हातात तुझ्या काही ना काही
धरणार कुठे सेल...मला बाई कळतच नाही"

"पितांबराला ना खिसा, मग कुठे ठेवणार ?
एक हरवल्यावर लगेच दुसरा मागणार"

"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल..."

बर्थ डे च्या आधीच मिळाला की सेल
गणेशबाप्पांना आता नवीनच खेळ

लावला ऐटीत कार्तिकला कॉल
पण ते होते बिझी शोधीत मॉल

"सुखकर्ता दु:खहर्ता"...ची वाजली धून
चमकून बघतात तर स्वतःच्याच सेलमधून

मोदक जेव्हा आठवले आरती रिंगटोन ऐकून
सेल टाकून बाप्पा धावले सोंड उंचाउन