पंचामृत

  • आमसुले- ९-१०
  • गूळ -पाऊण वाटी
  • तिळाचे कूट व दाण्याचे कूट- प्रत्येकी अर्धी वाटी
  • मिरच्या बारीक चिरून -२, मीठ
  • आले किसलेले - अर्धा चमचा, फोडणीचे साहित्य
१० मिनिटे
४-५ जण

प्रथम आमसुले ३ वाट्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावीत. नंतर हेच पाणी आमसुलांसकट उकळायला ठेवावे. एक-दोन उकळ्या फुटल्यावर गार होऊ द्यावे. हाताने आमसुले कोळून घ्यावीत व चोथा टाकून द्यावा. दोन-तीन आमसुलांचे तुकडे उरले तरी चालते.

दुसऱ्या एका जाड बुडाच्या पातेलीत तेल तापवायला ठेवावे. चांगले तापल्यावर जिरे-मोहोरीची फोडणी देऊन , हिंग, कढिपत्ता, मिरच्या टाकून आमसुलांचे पाणी घालावे. मग तिळाचे कूट, दाण्याचे कूट, गूळ, मीठ इ व्यवस्थित चवीप्रमाणे घालावे व ढवळून उकळी येउ द्यावी. घट्टपणा पळीवाढी असावा... म्हणजे पानात वाढल्यावर एकदम धावत नको सुटायला पण घट्ट गोळाही नको!

आंबट-गोड- तिखट अशी हि 'डिप' कशाही बरोबर खाता येते... पण सणाच्या स्वयंपाकात डावीकडे जास्त महत्त्वाचे असते!

हवं असल्यास थोडं लाल तिखटही घालू शकतो.

सासूबाई