डॉक्टर नावाचा देव..

आपल्या समाजात Dr. नावाला खूप सन्मान आहे, कारण असं म्हटलं जातं देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे Dr. यांचा..देव जसे कुणाचे प्राण घेऊ शकतो किंवा वाचवू शकतो तसे Dr सुद्धा कुणाचेही प्राण वाचवू शकतो

पूर्वी हा देव खूप दुर्मिळ असायचा, पाच ते दहा खेडेगाव किंवा संपूर्ण तालुका मिळून तो  एखादा दोनच असायचा म्हणजे त्यांचे दर्शन म्हणजे फारच दुर्मिळ असायचे आणि ते सुधा संपूर्ण  ऑल rounder असायचे, सगळी कामे ते स्वताच करायचे,Compounder पासून ते Dr पर्यंत सगळंच... पण आज  काल ह्या देवाचा स्वरूप फारच बदलेला आहे... तो आज आपल्याला गल्ली-गल्लीत आढळतो.... ह्या देवाला शोधायला आता फारसे कष्ट करावे नाही लागत.

जो कुणी स्वस्थ आहे त्याला ह्या देवाची किंमत अजिबात कळत नाही पण ज्याला वाईट अनुभव येतो त्याला ह्या देवाची किमत मात्र खरच कळते आणि त्याचे महत्व सुद्धा..पण पूर्वी हा देव फार निस्वार्थी पणे काम करायचा ..आज  हे स्वरूप फार बदलले आहे..पण आज हि काही प्रामाणिक कर्तव्य करणारे देव आपल्या समाजात आहेत.

पूर्वी ह्या देवाचे स्वरूप फार वेगळे असायचे,तो एक टेबल-खुर्ची आणि एक तपासायचं बाकड कम बेड असलेल्या अशा मंदिरात आढळायचा ...पण आज काल ह्या देवाचे स्वरूप फार बदलेला आहे ....आज काल हा देव AC डीस्पेनसरी मध्ये एखाद्या कंपनीच्या CEO ला शोभेल अशा थाटात बसलेला असतो..आता खुर्ची कुशनवाली ..तपासायचा बाकड सोडून कुशनवाला hi-tech बेड ..अशा अलिशान मंदिरात आज काल हा देव आढळतो..

असो पण ह्या वातावरणात त्यांच्याशी भेटण्याची तुम्हाला जबरदस्त फीस द्यावी लागते...असाच एकदा मी एका स्कीन स्पेशालीस्ट कडे गेलो होतो..तिथला अनुभव हा माझ्यासाठी फारच विलक्षण होता ..स्कीन स्पेशालीस्ट हा नामांकित होता ..म्हणजे जशी विठोबाच्या मंदिरात दर्शनसाठी रीघ लागावी तशी काहीतरी परिस्थिती तिथे होती..शेवटी Dr. हा देखील पृथ्वीतलावरील देवच आहे  तिथे पण दर्शनासाठी रीघ लागणे साहजिकच होते .. कारण हा देव देखील नामांकित ...मी जाताना एवढी गर्दी असणार हा विचार केलेलाच नव्हता..गेलो तर रेसिप्शन वरील बाई ने एकदम तुच्छतेने नाव विचारले..मी सांगितले ...तुछ्तेनेच लिहित तिने सांगितले  "तुमचा नंबर ९६ आहे..बसा तिकडे".. जशे देवाच्या ठिकाणी मंदिरात आत सोडणाऱ्याला सगळे जग तुच्छ वाटते .. कारण तो देवाच्या सगळ्यात जवळ असतो आणि देवाकडे बघणे त्याला नेहमीचच झालेला असतं.. आपण बिचारे देवाकडे श्रद्धा घेऊन जात असतो आणि तो आत सोडणारा आपल्याकडे एकदम त्रस्त होऊन बघत आपल्याला आत सोडत असतो.. असाच काहीसा प्रकार मला जाणवला.. असो आपली श्रद्धा आपण भेटायला आलेल्या देवासाठी ठेऊन मी मुकाट्याने समोर सांगितलेल्या बाकावर जाऊन बसलो ...

एक-एक नंबरत जात होता...आणि आत बसलेल्या देवाचा कृपा प्रसाद घेऊन बाहेर येत होता.. मला खूप असा कुतूहल होता कारण दवाखाना (मंदिर) बंद व्हायला १ तासच बाकी होता आणि अजून ५० तरी नंबर बाकी होते..कस बर सगळ होणार ह्याच मला कुतूहल निर्माण झाल होत...जिकडे -तिकडे मंदिरात आपण दर्शन घ्यायला आलेल्या  देवाचे सत्काराचे फोटो लावलेले होते..ठिकठिकाणी देवाची दक्षिणा ..फीस पूर्ण द्यावी ह्याची हि पती लावलेली दिसत होती ..जसा जसा माझा नंबर जवळ आला तसं-तसं माझ आत जाऊन दर्शन घेण्याची उत्सुकता वाढू लागली...

माझा नंबर आला .. तेव्हा रेसिप्शन वाल्या बाई ने मला दरवाजा जवळ येऊन उभा राहायला सांगितला...माझ्या आधीचा भक्त जाऊन बाहेर आला आणि मग मी आत गेलो....मी देवाकडे बघणार तोच मला तिथे असलेल्या २ पुजारी (असिस्ट) ह्यांनी मला देवाकडे बघू न देताच स्टूल वर बसायला सांगितला  आणि जशे प्रश्न-उत्तरांचा खेळ खेळतात तशी विचारणा सुरु केली.. मी देवाकडे बघायचा प्रयत्न करत होतो पण ते दोघांनी जो प्रश्न-उत्तराचा तास चालू केला ....तो मला मी श्रद्धेने भेटायला आलेल्या देवाकडे बघूच देयीना...तो पर्यंत देवाने माहित असलेली सगळी औषधे समोरच्या एका व्यक्तीला लिहायला सांगितली..शेवटी मी ज्याला श्रद्धेने भेटायला आलो त्या देवाला विचारलेच ह्या त्रासाचे कारण काय? कशाने होत? तर देव म्हणाला "होईल सगळा ठीक"......

बस एवढा बोलून देव शांत झाला..त्याची आणि माझी नजरा-नजर देखी झाली नाही ..तोवर मला समोर बसलेल्या पुजारी (असिस्ट) बोलली .."बाहेर ४०० रुपये जमा करा..आणि next अशी ओरडली" हे ऐकून मी चकितच झालो.. जसा विठ्ठलाच्या दर्शनाला तुम्ही श्रद्धेने जाता ...आणि तिथे असलेला पुजारी तुमची आणि देवाची नजरा-नजर सुद्धा न होऊ देता तुमचा बक्हाड धरून बाहेर ढकलतो .. अगदी त्याच प्रमाणे मी ज्याला श्रद्धेने माझ गाऱ्हाणं सांगायला आलो त्या देवाची आणि माझी नजरा-नजर न होऊ देता अगदी ५ सेकंदा मध्ये मला बाहेर काढण्यात आलं..

मी बिचारा बाहेर येऊन पैसे देऊन ...औषधे घेऊन आपल्या आपल्या वाटेला लागलो..

असो...देवाने जसा सांगितला होता त्याप्रमाणे १ आठवड्या मध्ये सगळा ठीक पण झाल..पुन्हा भेटायला बोलावलेल्या दिनांकला मला परत त्या देवाकडे जाण्याची इच्छा पण झाली नाही..पण देवाची कृपा दृष्टी झाल्याने सगळा काही ठीक झालं.

आज समाजात बरेच अशे देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना शक्ती देवो त्यांच्यामुळेच आज आपण निश्चिंत आहोत.. आणि बरेच काही देव असे आहेत माझा देव बनण्यात झालेला सर्व खर्च लवकरात लवकर कसा भक्तांकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो..

आज हा Dr. नावाचा देव बसलेला आहे म्हणून आपण निश्चिंत पणे जगतो आहे .. कारण मला माहिती आहे मला काहीही झाले तरी माझी काळजी वाहण्यासाठी भगवंत जरी नाही आला तरी Dr. नावाचा देव आज गल्ली गल्ली तल्या मंदिरांमध्ये बसलेला आहे..:)