देवा

देवा

देवा कितिवेळ राहणार
देव्हाऱ्यात उभा
एवढाच आहे कारे
तुझा सुभा

जरा बाहेर येऊन बघ
आमची तगमग
अर्धवेळ उपाशी राहून
जगण्याची लगबग

किती काळ नुसतेच
कष्ट करायचे
उपाशीपोटी पाणी पिऊन
तुझे नाम स्मरायचे

केवळ मुखदर्शनाने
आम्ही का पावन व्हायचे
मुखावर हास्य विलसत
तू नुसतेच उभे राहायचे

राजेंद्र देवी