आव्हान

आव्हान ! खरं तर हा शब्द उच्चारताना तोंडाची जी स्थिती होते त्यातूनच ह्या शब्दाचं महत्त्व समोर येतं. शब्द दृष्टीस पडताच खऱ्या आयुष्यातल्या घडामोडींशी त्याची जोडी लावली जाते.
तसं पाहता,  आयुष्यात येणाऱ्या प्रयेक लहान-मोठ्या आव्हान्नांमुळे हल्ली आयुष्य "जगणं" हेच एक आव्हान होऊन बसलंय. 
मग एखाद्या ध्येयवेड्याला आपलं ध्येय सध्या करताना भेटणारी आव्हाने असतील किंवा एखाद्याला भोगाव्या लागणाऱ्या आपत्तीमधून मार्ग काढून पुन्हा ताठ उभे राहण्याचे आव्हान असेल. 
गरीब आणि सामाजिक दृष्ट्या हतबल असणाऱ्या घटकांना रोजच पेलायला लागणारी आव्हाने असतील, किंवा मग अतिशय प्रतिष्ठीत व्यक्तीला आपली इमेज सांभाळायचं कडवं आव्हान असेल.
प्रत्येक आव्हान हे ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच स्थान निर्माण करून असतं.
आव्हान हे कोणत्याही स्वरुपात असू शकतं. 
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुघलांना नमवण्याच छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आव्हान होतं. पुढल्या काळात देश पारतंत्र्यात गेला, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आव्हान समस्त भारतीय बांधवांकडे होतं. 
पूर्वीपासून आलेल्या परंपरांवर मात करायचं आव्हान स्त्रियांसमोर होतं. एखाद्या मुलीला आईच्या गर्भातून सुखरूप बाहेर येण्याच पण एक आव्हानच आहे की ! 
कोणाला परीक्षेत पास व्हायचं आव्हान, तर जो पास होतोय त्याला चांगली नोकरी मिळवायचं आव्हान. कोणाला स्वतः:च घर साकारायचं आव्हान.
प्रत्येक शतक करताना सचिननं पेललेलं आव्हान. त्याचं शतक होऊ न देणं हे विरुद्ध संघासमोरचे आव्हान. 
लंगड्याला चालण्याच आव्हान, तर बहिऱ्याला ऐकण्याच आव्हान. आंधळ्याला जगाचं स्वरूप मनात साठवण्याच आव्हान.
प्रत्येक जण आपल्या ताटात असलेलं आव्हान मोडून काढत यशस्वी होत असतोच. पण त्यासाठी मोबदला हा मोजावा लागतोच.
छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केला ते आपल्या प्राणांची बाजी लावून. भारताला स्वातंत्र्य मिळालं ते अनेक क्रांतिकारकांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीमुळेच.
अभ्यासात जरा जोर मारल्यावर परीक्षेत तो पास होतो. पास झाल्यावर अथक परिश्रमांनी त्याला नोकरी सुद्धा मिळते.
फार मोठ्या अनुभवातून आणि परिश्रमातून सचिन आतापर्यंत ९९ शतके नोंदवतोचकि. 
घरासाठी काडी काडी जमवून तो स्वतः:च घर घेतो. कुबडीचा आधार घेऊन लंगडा चालायला लागतो. ऐकू येत नसलं तरी बहिरा संवाद मात्र सादतोच. दिसत नसलं तरी आंधळा "दृष्टी" शोधतोच.
प्रत्येकाच्या आयुष्यात असणार हे आव्हान प्रत्येकालाच खास असतं. आव्हानाशिवायच आयुष्य ते काय आयुष्य !