अण्णा हजारे.........

अण्णा हजारे

"मूर्ती लहान पण कीर्ती महान".

जसे गांधीजींनी व त्यांच्या सहकार्यांनी इंग्रजांना  वठणीवर आणले होते तसेच या भ्रष्टाचारयुगात पण एक गांधीजी जन्माला आले आहेत आणि ते म्हणजेच अण्णा हजारे................ होय, होय अण्णा...................................

"अण्णा" अशी हाक महाराष्ट्रात मोठ्या भावाला किंवा वडीलधाऱ्या माणसाला आपुलकीने आणि हक्काने मारली जाते.

आणि खरंच या नावाच अण्णांनी सार्थक केलं. आज या जगात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे , त्यामुळे महागाई वाढली, शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आणि याला कोठे तरी संपवायला पाहिजेच म्हणून तर जसे देवाने प्रत्येक युगात  अन्याय्याविरुद्ध एक  महापुरुष जन्माला घातला तसेच या युगात पण अण्णा हजारे सारखा महापुरुष या युगात आला आहे.

"लोकपाल" बील मंजूर करण्यासाठी मृत्यूला न घाबरता ८ दिवस दिल्लीत आमरण उपोषण केले, तेव्हा कुठे सरकारच डोकं ठिकाणावर आलं आणि लोकपाल बिलाला मंजुरी मिळाली.

ज्या वयात वयोवृद्घ माणसे घरात आपल्या नातवंडाबरोबर खेळत असतात किंवा आरामात , देवाचे नामस्मरण करण्यात घालवतात त्या वयात अण्णा आपल्या या गरीब जनतेसाठी या भ्रष्टाचारी नेत्यांना आव्हानासाठी लढा देण्यासाठी मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. 

आज २७/१२/२०११ मंगळवार मुंबईंच्या मैदानावर तब्येत बरी नसतानाही मृत्यू आला तरी आज उपोषण करणारंच असे ठणकावून सांगणारं अण्णा हजारेच होय. त्यामुळे त्यांची वाट बघत आज हजाऱ्यांसाठी हजारो जनसमुदाय मुंबईच्या मैदानावर उपस्थित आहे. या जनसमुदायच्या पुढाकारानेही आज अण्णा पुन्हा या सरकारला लोकपाल बील मंजूर करायला आणि लवकरात लवकर अमलात आणायला भाग पाडतील. आणि सरकार ने ही ते  पूर्णं करावे हीच अपेक्षा आहे.

म्हणूनच मला म्हणावेसे वाटते.

"खुदा के घर देर हे, अंधेरा नही,".

भारतमाता की जय, वंदे मातरम्:.