मे २०१२

भूक होती

पोटात माझ्या भूक होती
ती फार मोठी चूक होती

पुसता कुणी त्यांना खुशाली
ती माणसे कां मूक होती?

जो एक दिसला हासतांना
त्याच्याकडे बंदूक होती

मग फेकले त्यांनी तिला, जणू
काया तिची थोटूक होती

ना ते कधी होतेच माझे
ज्याची किती जपणूक होती

धरतीस मी भेटून आलो
अवस्था तिची नाजूक होती

------------------------------ जयन्ता५२

Post to Feed

बंदूक
मूक
मिलिंदजी,
लावण्यपूर्ण
अवस्था
बंदूक
छान

Typing help hide