व्यर्थ आहे ठेवणे

व्यर्थ आहे ठेवणे ह्या काळजावरती पहारा
चोरणाऱ्या 'त्या' हजारो, एकटा मी राखणारा

भेटल्यावर चौकशी आधी पगाराची कशाला?
वाढवूनी दोन शून्ये सांगतो मग सांगणारा!

मावशी, आई वगैरे सोबती असल्या कधी तर
हाय! तेंव्हा व्हायचे मी तो 'दुरूनी हासणारा! '

लागते जावे तिला घेवून हॉटेलात उंची
वाचतो उर्दूप्रमाणे मेनुकार्डे वाचणारा..

व्यर्थ ठरते सर्व काही शेवटी होते असे की
भाग्य माझे ठरवितो तो 'चंद्र-तारे' पाहणारा

--- जयन्ता५२