उरला न कोणी

उरला न कोणी जोडणारा
जोषात आहे तोडणारा

काढा तुम्ही चित्रे उद्याची
तैयार आहे खोडणारा

फुटतो कसे आम्ही अजूनी
गेला घरी जर फोडणारा

भटकू नका, आता कुणी ना
आणून दारी सोडणारा

हा आपला इतिहास आहे
तू वाकता मी मोडणारा

(जयन्ता५२)