साखरांबा

  • कैरी (शक्यतो तोतापुरी आंब्याची) १ मोठी
  • साखर - १ वाटी, वेलदोडे पूड- अर्धा चमचा
२० मिनिटे
३-४ जण

प्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावी व साले काढून किसून घ्यावी. जाड बुडाच्या पातेलीत हा कीस व साखर मिसळून २-३ तास ठेवून द्यावे. नंतर मंद गॅसवर शिजवायला ठेवावे. पक्का पाक झाल्यावर आंच बंद करावी. पाणी अजिबात घालू नये. पाक फिरता व्हायला हवा (म्हणजे चमचा त्यात लीलया फिरला पाहीजे! )

गरम पोळीवर तूप घालून साखरांबा सोबत द्यावा.

काही नाही

स्वतः ('उंच माझा झोका' तील नव्हेत! )