थेंबा थेंबा ये रे

थेंबा थेंबा ये रे
मला न्हाऊ घाल रे

शॉवर तुझा छानसा
पण किती गार रे

सारखे सारखे
नको पाणी
मधून गारा
पाड रे

गारा खाऊ कुडुम कुडुम
नाच करू धडाड धुडुम...