पालक वड्या

  • पालक १ जुडी बारीक चीरुन
  • बेसन १ कप
  • तांदळाचे पीठ अर्धा कप
  • २ चमचे बारीक रवा
  • २ चमचे कौर्न्फ़्लोअर
  • शक्य असल्यास इतर पीठे ( ज्वारी , गहू , बाजरी, इ. ) मिळून २ चमचे
  • आले , लसुण , मिरची पेस्ट १ चमचा , हळद , मीठ ,
  • तीळ , लिंबाचा रस १ चमचा , खायचा सोडा चिमुटभर
१५ मिनिटे
७ ते ८

सर्व पीठे एकत्र  करून  त्यात रवा मिसळावा.त्यात चिरलेला पालक  , हळद ,आले , लसुण , मिरची पेस्ट,

लिंबाचा रस १ चमचा , खायचा सोडा चिमुटभर , चवीनुसार मीठ  घालून

रोल होइल  असे  मळावे , गरज असेल तर थोडे पाणी वापरावे.

रोल करून , तीळात  घोळवावे. मायक्रोमध्ये किंवा कुकरमध्ये उकडून घ्यावेत.

थंड झाल्यावर वड्या  कापून तळाव्यात.

भाजी खायला कंटाळा करणारी मुले, वड्या मात्र लगेच फस्त करतात.

(  सर्व पीठामुळॅ पौष्टीक होतात. पालक मात्र पेस्ट न करता , बारीक चिरुनच घालावा.)