माणसांवाचून कोणी एकले नसते

माणसांवाचून कोणी एकले नसते
अन्यथा कळपात कोणी कोंडले नसते

कोण म्हणतो भूत असणे हे भले नसते?
देह नसता आणि त्याचे चोचले नसते

सोबतीचे सूर संवादी अगर निघते
मौनरागाने असे नादावले नसते

मात-पितरांना कमी लेखू नको इतका
मौक्तिके नसती; अगर हे शिंपले नसते

संशयास्पद वाटते भाषा अलंकारी
सत्य काही एव्हढे शृंगारले नसते