जुलै ३० २०१२

दिवाळी अंकासाठी श्राव्य साहित्य हवे आहे

ह्या वर्षी मनोगतच्या दिवाळी अंकात प्रथमच श्राव्य विभाग ठेवण्याचा विचार आहे. त्यासाठी मनोगतींनी स्वतःच्या आवाजात गायन, कवितावाचन, भाषण, कथाकथन, नाट्यप्रवेश इत्यादी प्रकार ध्वनिमुद्रित करून पाठवावे ही विनंती. ध्वनिमुद्रण mp3 फाइलच्या स्वरूपात करावे. ध्वनिमुद्रणाचा बिट रेट किमान ९६ ते कमाल १२८ kbps असावा. गायन व कवितावाचन शक्यतो ५ ते ७ मिनिटांहून, व कथाकथन, नाट्यप्रवेश इत्यादी गद्य प्रकार ८ ते १० मिनिटांहून जास्त लांबीचे नसावे. श्राव्य विभागासाठी साहित्य स्वलिखित असण्याची अट नाही. मात्र लेखन स्वतःचे नसल्यास मूळ लेखकाचा उल्लेख करावा ही विनंती. ध्वनिमुद्रणाचे आधी प्रसारण झालेले नसावे. ध्वनिमुद्रणाची mp3 फाइल विरोपास जोडून diwman12@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवावी.

Post to Feed
Typing help hide