देशाच्या प्रगतीची बेरीज

नुकताच स्वातंत्र्यदिन संपन्न झाला. त्यानिमित्य मी चर्चेमध्ये सकारात्मक मत मांडले. कसा प्रतिसाद मिळतो म्हणून मनात धास्ती होती.
परंतु माझ्यासारखे बरेच सकारात्मक विचार करणारे वाचक आहेत हे पाहून हुरुप वाढला.
एका कागदावर  ठिपका काढला, तर संपूर्ण पांढऱ्या भागापेक्षा पाहणार्ऱ्याचे लक्ष ठिपकाच वेधून घेतो. अर्धा रिकामा प्याला, भरलेल्या भागापेक्षा
डोळ्यास जास्त खुपतो. तसे काहिसे आपल्या मानसिकतेचे झाले आहे.
देशाने केलेली प्रगती आम्ही अनुभवीत आहो, कारण, जसे दुःख भोगलेल्या व्यक्तीस सुख जास्त भावते, तसे जुने दिवस आठवले कि
आत्ताची प्रगती लक्षणिय वाटते.भलेही त्यात वैज्ञानिक प्रगतीचा मोठा वाटा असो, परंतु ही  विज्ञान गंगा आपल्या दारी सरकारमुळे आली (भलेही
सरकार कोणत्याही पक्षाचे असो).
आज प्रत्येक भारतीय आपले जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो. पूर्वीसारखे ठेविले अनंते तैसेची राहावे , हे मनोव्रुत्ती लोप पावत चालली आहे.
दळणवळण, परिवहन ह्यात आश्चर्य कारक प्रगती झाली. आताचा मध्यमवर्गिय देखिल विमानातून उडू लागला आहे.
संगणकीकरणामुळे भ्रष्टाचार फारच कमी  झाला आहे. रेल्वे आरक्षण हे त्याचे उत्तम उदाहरण. दैनंदिन व्यवहार -  बँकिंग , रेव्हेन्यूची कामे,
इनकम टॅक्स, इत्यादींचे संगणकीकरण झाल्याने कामे विनासायास व पारदर्शक होत आहेत.
मोबाइल मुळे तर क्रांतीच झाली आहे.
देश अन्न धान्याच्या क्षेत्रात खरेच स्वयंपूर्ण झाला आहे. ज्यांनी ७२ सालीच्या दुष्काळात अमेरिकेकडून मिळालेल्या मिलो साठी रेशन दुकानावर
लागलेल्या लांबच लांब रांगा पाहिल्या असतील त्यांना हे पटेल .  हे सर्व सिंचन वाढल्याशिवाय शक्य झाले नसते.
डॉ. अब्दुल कलामांचे विंग्ज ऑफ फायर वाचा. तुम्हाला जग सकारात्मक दिसेल.
जय हिंद !