शिक्षक दिन

५ सप्टेंबर २०१२ रोजी शिक्षक दिन सर्वत्र साजरा झाला तसा आमच्या एन एन पालीवाला ज्यू कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी अफलातून असा शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा केला . इ. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या सर्व तुकड्यांमध्ये ( जवळपास २४ वर्गांत ) ११वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून वर्ग अध्यापनाचे काम केले . हे करतांना या सर्व शिक्षक , शिपाई , मुख्याध्यापक बनलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या सर्व कामात चोख कर्तव्य निभावले . मुख्याध्यापक व पर्यवेक्षक बनलेल्या विध्यार्थ्यांनी १ सप्टेंबर पासून वेळापत्रक बनवणे , विध्यार्थ्यांना तासिकांचे वाटप करणे , शिपाई व पर्यवेक्षक नेमणे अशी महत्वाची कामे केलीत . प्रत्येक्ष शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जबाबदार्या व्यवस्थित पार पडल्या. वर्ग अध्यापनाचे कार्य झाल्यानंतर याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करता यावा म्हणून औपचारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ईश स्तवन,स्वागत पद्य ,शिक्षकांना गुलाबपुष्पे देऊन स्वागत , प्रास्ताविक , भाषणे, आभार  असा भरगच्च कार्यक्रम साजरा केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती  आदर भाव दाखवत व व्यक्त करत अनोख्या शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमामुळे सर्व शिक्षकांनी या विध्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.