दरवाढ

रोज येणाऱ्या बातम्यांत एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे दरवाढ त्यामुळे एकेकदा असे वाटते की सरकार जे सांगते की आपण महासत्ता बनतो आहोत त्यामुळेतर ही दरवाढ होत नसेल ना? मी काही अर्थशास्त्र जाणत नाही त्यामुळे मला वाटते आपण सुद्धा त्याला कारणीभूत नसू ना? म्हणून वाटते जर आपण देशाला पुढे आणण्यात मदत करायला हवी असेल तर मला वाटते सरकारने सरकारी पातळी वर  जर परदेशातून येणाऱ्या कंपन्यांना ज्या सवलती द्याव्या लागणार असतील त्या देताना प्रथम भारतात त्या सवलती उपलब्ध करून सहा महिन्यानंतरच परकीयांचे साठीचे दार खुले करावे.
दुसरे म्हणजे आपल्या लोकांना सध्या भरपूर सुट्याची सवय झाली आहे  त्यामुळे त्यांना जर सर्व सुट्या रद्द करायच्या झाल्या तर सुरवातीला तरी पगारी रजा वाढवून द्याव्या लागतील. तसे केले म्हणजे तरी आपली सरकारी कामे लवकर होतील शिवाय असे करताना जे ९*५ असे आठवड्या चे दिवस ठरविले त्या ऐवजी ६*७.५ असे करावे लागतील  व २रा व ४ था शनिवार सुद्धा सुटी रद्द करावी लागेल. पण हे सर्व मुख्य करून कोणतेही काम करायचे झाले तर येणाऱ्या कायदेशीर अडचणीचा विचार करता वाटते