ऑक्टोबर २१ २०१२

तरुणाईची सामजिक जाणिव

००/००/ - प. १२:००
एन .एन. पालीवाला ज्यू. कॉलेज ,नवीन पनवेल या विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेत ( एन.एस.एस.) सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांनी कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे मोलाचे कार्य केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या संस्थेच्या एन.एन.पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल या विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबविले जातात.त्याचाच भाग म्हणून या वर्षी विद्यालयाचे प्राचार्य श्री . डी.व्ही. पवार सरांनी  कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे आवाहन विद्यालयातील एन.एस.एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री . संजय पाटील व श्रीमती हेमलता पुराणिक यांच्या मदतीने  विध्यार्थ्यांना  केले होते. त्यानुसार सर्व स्वयंसेवकांना निधी संकालासाठीचे छापील कार्ड वाटले होते. 
         स्वयंसेवकांनी या योजनेला उस्त्फुर्त पाठिबा दिला . गणपती सुट्टीत या सर्व स्वयंसेवकांनी समाजातील दानशूर व्यक्तींकडून तब्बल ११७०० रुपये इतका भरघोस निधी अवघ्या १५ दिवसात जमा करून प्राचार्यांच्या स्वाधीन केला.  
         सौ . काशीद के.व्ही.,व इतर सर्व वर्गशिक्षक व सहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेऊन या मोलाच्या सामाजिक कार्याला हातभार लावला म्हणून प्राचार्य पवार सरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.  

Post to Feed
Typing help hide