साथ

ह्या क्षणांची साथ मी सोडू कशाला?
जे न माझे त्यांतुनी निवडू कशाला?

बोलणे माझेच मी खोडू कशाला?
मीच माझ्यावर पुन्हा बिघडू कशाला?
बोलताना मी तुला तोडू कशाला?
अन् तुला शब्दांत मी पकडू कशाला?
मौन जर साधून देते सर्व हेतू
तोंडच्या वाफेस मी दवडू कशाला?
राहशी तू दूरवर चंद्राप्रमाणे
दार स्वप्नांचे तुला उघडू कशाला?
भागते शून्यात माझे सर्व काही...
व्यर्थ हे मी आकडे मोडू कशाला?
- कुमार जावडेकर