विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!

गझल
विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!
प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!

दु:खांमध्ये श्रद्धेची होतेच परीक्षा....
नभ फाटू दे, तेही शिवती समर्थ स्वामी!

राखेमधुनी सुद्धा गावे उभी राहती!
तुटलेले संसार वसवती समर्थ स्वामी!

हवा भाव अन् हवी सबूरी भक्तापाशी;
माळरानही पहा पिकवती समर्थ स्वामी!

उगा कशाला धावावे मागुनी सुखाच्या?
अरे, सुखाचे मळे पिकवती समर्थ स्वामी!

दूर तुझ्यापासून कुठे गेलेत कधी ते!
श्वासाश्वासामधे धडकती समर्थ स्वामी!!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१