गझल अभ्यासक - डॉ. विनय वाईकर यांचे निधन

२०१३ चे वर्ष सुरु होऊन चार दिवस होत नाहीत पण रोज कोणती ना कोणती दु:खद बातमी कानावर पडते आहे.

काल गझल या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके (आईना-ए-गझल,गुलिस्तान-ए-गझल इत्यादि) लिहणारे जेष्ठ लेखक डॉ.विनय वाईकर यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मन सुन्न होऊन गेले. उर्दू-मराठी गझलरसिकांवर डॉ.विनय वाईकर यांचे अनंत उपकार आहेत. आईना-ए-गझल,गुलिस्तान-ए-गझल ही पुस्तके गझलच्या विषयातल्या ज्ञान आणि आनंदाचा अक्षरशः खजाना आहेत.

डॉ.विनय वाईकराबद्दल असेच म्हणावेसे वाटते:

'तो दोस्त वेगळा होता
एक असुनी सगळा होता'

अलविदा, डॉ.वाईकर!

------- जयन्ता५२