फेब्रुवारी २८ २०१३

कारली रस भाजी

जिन्नस

  • हिरवीगार कारली २ मध्यम आकाराची
  • तीळकूट पाव वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी
  • लाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, गरम मसाला १ चमचा
  • नारळाचा खव अर्धी वाटी, चिंचगुळाचे दाट आंबटगोड पाणी अर्धी ते पाऊण वाटी
  • फोडणीसाठी तेल
  • मोहरी, हिंग, हळद
  • मीठ

मार्गदर्शन

सर्वात आधी कारली धुऊन घ्या. ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. फोडी करताना कारल्याच्या आतील बिया काढा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घ्या. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात कारल्याच्या फोडी घालून त्यावर झाकण ठेवा. वाफेवर कारली शिजतील. अधून मधून झाकण काढून थोडे ढवळा. कारली अर्धवट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. थोडे ढवळून परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून त्यात तीळकूट, दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. परत भाजी सर्व बाजूने नीट ढवळा. आता थोडे पाणी घालून अजून थोडी शिजवा. शिजवल्यावर ही भाजी थोडी आटून दाट होते.  आता गॅस बंद करा. अजून पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे. वर मसाल्याचे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालेल. कारली शिजली आहेत की नाही हे पाहण्याकरता ती डावेने मोडून पहा.

टीपा

टीपा नाहीत.

माहितीचा स्रोत

सौ आई

Post to Feedपा. कृ. आवडली
धन्यवाद!
पा. कृ. आवडली...

Typing help hide