आलू दम!

  • १०-१२ छोटे बटाटे(बेबी पोटॅटोज)
  • १ कांदा, २ टोमॅटो, २ लसूण पाकळ्या
  • १०-१२ काजू, २ लवंगा, २ मिरे
  • चवीनुसार तिखट, मीठ
  • मूठभर कोथिंबीर
४५ मिनिटे
२ जणांसाठी

बटाटे उकडून घ्यावेत. त्याची साले काढून तेलात सोनेरी रंगावर हलकेच तळून घ्या.

ग्रेव्हीसाठीः कांदा बारीक चिरून लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावा. लवंग मिरे ही भाजून घ्यावेत. काजू ,कांदा,लसूण,लवंग,मिरे याची बारीक पेस्ट करून घ्यावी. ती बाजूला काढून मग टोमॅटो प्युरी करून घ्यावी.

कृतीः
तेल गरम करून त्यात कांदा/काजू पेस्ट परतून घ्यावी. मग टोमॅटो प्युरी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतावी. त्यात चवीनुसार तिखट मीठ आणि पाणी टाकून परतावे‌. शेवटी तळलेले बटाटे टाकून मंद आचेवर ठेवावे. उकळी आली कि, वरून कोथिंबीर टाकून वाढावे.

फार पाणी टाकू नये. दाटसर ग्रेव्ही चांगली.
पोळीबरोबर छान लागते. सोबतीला जिरेभात (जिरे, काजू आणि कोथिंबीर घातलेला) असेल तर जेवणाची लज्जत अजून वाढते.
चु.भु.द्या.घ्या.

एक मैत्रिण!