पहिले नमन.....दुष्काळाला !

नमस्कार लेखक-वाचकांनो,

मी वळू, अनेक दिवसाने ह्या वेबसाईटबद्दल कळले, असो उशिरा का होईना पण गेले २ दिवसात बऱ्यापैकी चांगले निरिक्षण झाले, आणि म्हटले उघडावे खाते...हे माझे पहिले नमन.... ह्या साऱ्या श्रोत्रुवर्गाला, कामाच्या व्यापात लिहिता किती येईल कठीण आहे, पण वाचन मात्र नक्की करणार बरं का...

सुरुवातीलाच चर्चेचा विषय थोडा वादाचा:

" ११ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे, कबूल - पण मग तिथे जे पाणी जाउ शकत नाही ते इथे वाचवून काय फायदा ? इथे  आहे ना पाणी, आणि आम्ही पैसे भरून मागवतोय टँकर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?" ---- ह्या दादागिरीवजा भाषेला कोणीही उत्तरे देत नाही, कालच कोणत्यातरी एका सत्संगात पण पाणी वाया घालवल्याचे सांगितले आहे,  अनेकदा मोठ्या बिल्डिंग्स चा पाया खणताना पाणी लागते, आणि पत्र्यांच्या तटबंदीमागून ते तसेच एका  पाईपद्वारे गटारात सोडण्यात येत असल्याचे मी अनेकदा पाहिले आहे....पाण्याचा कायदा आणि तो पाळला जाईल हे पाहणारे जागरुक लोकं देवानेच पैदा करून पाठवले पाहिजेत बहुदा....

मुळात पाणी वाया घालवण्यालाच विरोध आहे आपला... आणि त्याबद्दल जास्त काही करता येत नाही याची अमाप खंत !

रंगपंचमी किंवा धुळवड ह्यासारख्या सणांमध्ये वारेमाप पाणी वाया घालवणे - ह्याबद्दल आपले काय मत ? (की तुम्हीही वरचीच वाक्ये वापरून मस्त एंजॉय वगैरे करणार ?)