एप्रिल २०१३

टोमॅटो रस्सा

जिन्नस

  • लाल टोमॅटो ६
  • दाण्याचे कूट मूठभर, ओला नारळाचा खव मूठभर
  • थोडी चिरलेली कोथिंबीर
  • लाल तिखट अर्धा चमचा, धनेजिरे पूड अर्धा चमचा
  • साखर २ चमचे, मीठ चवीपुरते
  • फोडणीसाठी तेल
  • मोहरी, जिरे, हिंग, हळद

मार्गदर्शन

टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. आता या फोडणीत चिरलेले टोमॅटो घाला व परतून घ्या. थोडे पाणी घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर, मीठ घाला व परत एकदा ढवळून त्यात थोडे पाणी घाला व परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर घालून रस्सा पातळ होण्यासाठी १ ते २ वाट्या पाणी घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. रस्सा तयार झाला आहे. गरम गरम भाताबरोबर हा रस्सा छान लागतो. टोमॅटो शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा रस्सा झटपट होतो.

टीपा

टीपा नाहीत.

माहितीचा स्रोत

सौ आई

Post to Feedसुरेख..
आवडता रस्सा..
धन्यवाद

Typing help hide