लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज ???

आजच्या पिढीचे कडू वैवाहिक जीवन आणी सत्य.
- सुशील

हा लेख फक्त एक लेख नसून आजच्या तरुण पिढीला पडलेला एक नाजुक आणि पुरता गोंधळात टाकणारा एक असा प्रश्न आहे जो एकदा तरी सामान्य पणे प्रत्येकाला नक्की पडतोच.
"लव्ह मॅरेज इज बेस्ट ऑर अरेंज मॅरेज..???"
मला ठाऊक आहे की, व्यक्ती पाठोपाठ प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलणार आणी विचार सुद्धा हे आपण जाणूनच आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना २ सत्य घटना सांगतो मग तुम्हीच काय ते ठरवा.. आणि शक्य झाल्यास स्वतःला या कथेतील एक पात्र समजून त्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्या मनाचा आणि त्यात सुरू असलेल्या गोंधळाचा कानोसा घ्या, तेवढं जमल्यास वरील प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच
सांगू शकता..

एक शिकल्या सवरलेल्या कुटुंबातील मुलगी, वडील पूर्वीचे ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झालेले, त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलीला D.ed पर्यंतचे शिक्षण दिले, आणी पालकत्वाची जबाबदारी म्हणून शेजारच्या तालुक्यातील सामान्य कुटुंबात लग्न लावून दिले. नवरा मुलगा S.Y. B.A पर्यंत शिकलेला आणि रेल्वे खात्यात पोलीस म्हणून होता... लग्नानंतर मुलीला नोकरी मिळाली ती स्वतः कमावायला लागली. पण लग्नानंतर दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरून भांडण व्हायला लागली.... प्रकरण घरातून- शेजारी, नंतर शेजारून दारात मग दारातून रस्त्यावर गेलं.. आणि गेल्या २-३ वर्षापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशन पर्यंत गेलं...  
लग्नानंतर या जोडप्यास ३ मुलं झाली.. खेळता- खेळता ती पोरं कधी आणि कशी मोठी झाली त्यांचं त्यांनासुद्धा समजलं नसावं. पण डोळ्यादेखत आई बापाची भांडणं आणि अश्लील शिव्या-शाप ऐकून ती पोरं वेडी व्हायची. रात्रभर झोपताना विचार करायची की, आपल्या शेजारी राहणारे लोक परिस्थितीनं गरीब आणी कमी शिकलेली असून सुद्धा आनंदी आणि मोकळं जीवन जगत होती. मग तसं आयुष्य- तसं जीवन आपल्याला का मिळालं नाही?? काय पापं झालं असेल गेल्या जन्मी आपल्या हातून की हे असे आई- बाप आपल्याला मिळाले??
(जन्माला येताना देवाने आपल्याला आई- बाबा आणी जात- धर्म निवडण्याची Choice दिली असती तर, किती बरं झालं असत ना??? ) अगदी आजही या घराची आणि कुटुंबाची स्थिती होती तशीच आहे. पूर्वीप्रमाणे आजही या घरातला बाप सट्टा-पत्त्याचा शौकिन आहे. तर आई ही (मुलांसाठी म्हणून) पैसा- पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतेय, त्या useless प्रयत्नात तिने रक्ताची नातीच नाही तर स्वतःच्या मुलांपासून सुद्धा दुरावा निर्माण केला, ती सारखी त्या पोरांना "जा घराबाहेर, हे माझं घर आहे, निघा इथून"  किंवा "जा निघा आणि भरा स्वतःची पोटं स्वतः लागा कमाईला" असं म्हणून कोसतेय.
कित्येकदा तर जेवत्या ताटांवर त्या पोरांना म्हणते "मी तुझी टुशन फी, शाळेची फी भरलीये आण माझे ते पैसे परत मग जा घर सोडून. "
तिच्या नकळत ती पोरांना एकमेकांपासून वेगळं करत होती ( केलंय ) ..
नेहमीच ती पोरांना म्हणायची की "हे माझं घर आहे इथे मी सांगेल तसंच वागावं लागेल, मी सांगेल तेच करावं लागेल"... ज्या वयात मित्र बनवणे, पोहणे, खेळणे हे मुलांचे  छंद असतात त्या वयात त्या वयात (स्वावलंबनाच्या नावाखाली) त्या पोरांना स्वतःची कपडे स्वतः धुणे, घर पुसणे, पाणी भरणे, स्वतःच जेवणाच ताट स्वतः वाढून घेणे आणि धुऊन ठेवणे इ. काम इशाऱ्यावर करावी लागायची. या सर्व प्रकारात आईने तिचे हिटलरशाही धोरण राबवले आणि स्वतःच्या मुलांना गुलामाप्रमाणे वागवले- वाढवले- वापरले. आता मात्र पोरं आतून पार खचली होती, आणि पुरती गोंधळली होती, कारण बापाची बाजू घ्यावी तर तो त्याच्या रंगेल जिंदगीत खूश होता आणि आई ची बाजू
घ्यावी तर ती पैशासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काय करेल आणि जबान (शब्द) बदलेल हे सांगणं पण तेवढंच कठीण होतं
त्यातच आई घरात वेगळंच वागायची आणि नवऱ्या समोर वेगळा दिखावा करायची.. जणू ही मुलंच चुकीच काही करत आहेत, आणि मी आदर्श बायकोप्रमाणे वागतेय.
हि वरील सर्व स्थिती अगदी आज सुद्धा होती तशीच आहे. आता तुम्हीच ठरवा की या आई- बापाच्या पोटी जन्म घेणाऱ्या त्या ३ मुलांची काय चूक??
त्या मुलीच्या (यातील आईच्या) वडिलांना जर नवऱ्या मुलाविषयी पूर्वकल्पना असती तर किंवा त्या मुलीला जर त्या नवऱ्या मुलाच्या सवयी बद्दल आधीच माहिती असती तर या नव्या ३ जीवांचा बळी नक्कीच गेला नसता..!!!

आता अशीच एक भयानक सत्य कथा..
एक सामान्य कुटुंबातील मुलगा मूळचा 'नगरचा', पुणे विद्यापीठातून B.Com झालेला, पुण्याच्या एका सामान्य मुलीसोबत लग्न करतो, मुलगी असेल १० वी- १२ वी पर्यंत शिकलेली. मुलगा काहीही काम- धंद्यास नव्हता म्हणजेच नोकरीवर नव्हता. तो स्वतःला खूप मोठा विद्वान आणि मोठ्या श्रीमंत जमीनदार बापाचा एकुलता एक असल्या सारखा समजत होता, ( खरं तर आजच भागेल पण उद्याचं काय हा प्रश्न होता )
त्याच्या या मी पणा मुळे त्याला नोकरी मिळत नव्हती, किंबहुना "एवढं शिकलो पण नोकरी नाही" या Statement खाली तो स्वतःचा नाकर्तेपणा लपवायचा. त्यातच त्याच्या बायकोला एका सरकारी खात्यात स्वयंपाकी (Cook) म्हणून नोकरी मिळाली, आता समाजाची लाज आणि टोमण्यासाठी त्याने एक ऑटो विकत घेतला. थोड्याच दिवसात माझी प्रतिष्ठा ढासळतेय अस म्हणून त्याने ऑटो विकला, आणि त्याच शहरात एका हॉस्पिटल मध्ये सुपरवाइझर म्हणून काम करायला सुरुवात केली. (पगार ८- ९ हजार).
काही वर्षातच त्यांच्या संसारात २ नव्या पाहुण्यांची नोंद झाली. एक मोठी मुलगी आणी एक मुलगा.
आज त्यांची ती मुलगी तब्बल २० वर्षांची झालीय..
तुटपुंजा पगार मिळत असताना सुद्धा आपले रंगेल छंद मात्र तसेच जोपासले. (woodland चे २-३ हजार कीं चे महागडे शूज, स्वतंत्र महागडे साबण, लेटेस्ट परफ्यूम्स.. )
त्यातच त्याची ओळख, सोबत काम करणाऱ्या एका स्त्री सोबत झाली आणि मग नको त्या गोष्टींना उधाण आलं.  त्यामुळे नेहमीच बायको- मुलांना आई- बहिणी वरून अश्लील शिवीगाळ करायचा,...
काही दिवसातच ( त्याला समजावण्यासाठी का अद्दल घडवण्यासाठी माहीत नाही ) त्याच्या बायकोने घरा समोरच्या एका मुलाबरोबर सुत जुळवलं.. ( खेदाची बाब म्हणजे तो मुलगा या बाईच्या मुलाच्या वयाचा आहे ) 
आज त्यांच्या परस्पर संबंधांबद्दल एकमेकांना कळलंय. आणि "तेरी भी चुप ओर मेरी भी चुप" अस म्हणून ही प्रकरण तशीच सुरू आहेत.
आज त्यांच्या मुलीला त्यांच्या संबंधांबद्दल सर्व काही कळलंय. आणि ती रोज आत्महत्येचा विचार करतेय... ती रोज हाच विचार करते की तिची अशी काय चूक होती की तिला असे रंगेल आई- बाप भेटले??
आहे तुमच्या कडे या प्रश्नांची उत्तरं?? आता सांगा चूक कोणाची होती??

वरील या दोन्ही घटना सत्य आहेत आणि ही कुटुंब आजही अशीच आहेत.
सांगा जर लग्ना आधी त्यांना एकमेकांचे छंद, सवयी माहिती असते तर ही वेळ त्या मुलीवर आली असती का?? मग अरेंज मॅरेज बेटर का लव्ह मॅरेज हे आता तुम्ही स्वतःच ठरवा आणि तुमचा अभिप्राय नक्की सांगा,
सुशीलकुमार