मुळ्याच्या / वालीच्या शेंगांची भाजी

  • पाव किलो मुळ्याच्या / वालीच्या शेंगा - चिरून घ्याव्यात
  • तेल
  • १ कांदा - बारीक चिरलेला
  • १ टोमाटो - बारीक चिरलेला
  • २ चमचे घाटी मसाला
  • पाव चमचा हळद
  • चिमुटभर हिंग
  • २ चमचे शेंगदाण्याचे कुट
  • मीठ गरजेनुसार
  • खिसलेला ओला नारळ थोडासा
१५ मिनिटे
३-४ जणांसाठी
कढईत तेल तापवून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा नंतर घाटी मसाला, हळद, शेंगदाण्याचे कुट, मीठ, हिंग, बारीक चिरलेला टोमाटो टाकून परतावा. आता चिरून घेतलेल्या मुळ्याच्या / वालीच्या शेंगा टाकून एकजीव परतून घ्यावे झाकण ठेवावे ५-१० मिनिटात भाजी शिजते. या भाजीला पाणी सुटते तरी पाणी टाकू नये. वरून खिसलेले खोबरे घालावे. भाजी तयार
(या शेंगा जेवताना मिरचीसारख्या कच्च्या देखील खातात)
आई