अन्जीर मिल्क शेक

  • सुके अन्जीर - २५-३० नग (चार जण पिणारे असतील जवळ जवळ पाच ते सात अन्जीर प्रत्येकी)
  • थन्डगार दुध - १ लिटर
  • वॅनिला आईसक्रिम - आवडीप्रमाणे
  • साखर - प्रत्येकी २ टेबल स्पुन
१५ मिनिटे
चार जण

सुके अंजीर बुडतील एव्हढे दुध घालून भिजत ठेवणे. (दुध कोमट असल्यास लवकर काम होइल)

साधारण एक तासाभराने अंजीर मस्त उमलून नरम झालेले असतील.
आता मिक्सर मध्ये आधी अंजीर, साखर असे वाटून घ्यावे. गरज पडल्यास थोडेसे दुध त्यात घालावे आणि वाटून पेस्ट करणे.
नंतर त्यात बाकिचे दुध , वॅनिला आईसक्रीम घालून ब्लेंड करणे.
चार ग्लास मध्ये शेक ओतून त्यावर परत एक एक वॅनिला चा गोळा तरंगवणे.
एखाद्या संध्याकाळी जेवणा ऐवजी मस्त एखादा चमचमीत पदार्थ (स्टार्टर) आणि मग हा दणदणीत अंजीर  मिल्क शेक! कसा वाटतो बेत?
आवडत असल्यास काजू वा अक्रोड चे तुकडे देखिल घालावे. म्हणजे प्या आणि खा असा टु-इन-वन पदार्थ तयार होइल!
प्रयोग