ऑक्टोबर २०१३

२०१३ दिवाळी अंक रद्द

नमस्कार,

दिवाळी अंकाचे काम करण्यासाठी पुरेसे सक्रीय सदस्य उपलब्ध न झाल्याने अंकसमितीला मनुष्यबळाअभावी ह्यावर्षी दिवाळी अंक काढणे शक्य होणार नाही. गेली सहा वर्षे चालू असलेला हा उपक्रम ह्यावर्षी खंडित होत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

दिवाळी अंकासाठी अनुवादित लेखन पाठविणाऱ्यांचे अंकसमितीतर्फे आभार.  अजूनही इतर काही मराठी संकेतस्थळांच्या दिवाळी अंकांसाठी लेखन स्वीकारले जात आहे. लेखकांना त्यांची इच्छा असल्यास मनोगताच्या दिवाळी अंकासाठी पाठवलेले लेखन इतरत्र पाठवणे शक्य व्हावे. शिवाय मनोगतावर दैनंदिन लेखनामध्ये ते प्रसिद्ध करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.

लेखकांना झालेल्या त्रासाबद्दल अंकसमिती दिलगीर आहे.
- अंकसमिती

Post to Feedपरंपरा खंडित
असेच
दुःख झाले...
अपेक्षित आणि..
आजवर शब्दकोडी अनेकांनी तयार केलेली आहेत
दिवाळी-अंक : दिलगिरी आणि प्रशासकांना प्रश्न
'दिवाळी अंक २०१३'

Typing help hide