दिवाळी अंक २०१३ - एक वेगळा प्रस्ताव

मनोगत दिवाळी अंक (२०१३) रद्द होणार हे वाचून अतिशय वाईट वाटलं. (अर्थात, त्याला कारणीभूत
अंकसमितीत असूनही वेळ न देता आल्यामुळे आपणही आहोत अशी रुखरुख आहे आणि
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. )

एक प्रशासकांना प्रश्नः
ज्या
लेखकांनी भाषांतरे किंवा तत्सम लिखाण पाठवलं आहे, त्यांचं लिखाण 'दिवाळी
अंक २०१३' असा दुवा वापरून एकाच ठराविक दिवशी प्रकाशित करता येईल का?
(उदा. छत्र प्रतिसादांसारखं आधी मागवून आणि क्रमशः लिखाण जसं गुंफलं जातं त्याप्रमाणे.)

लेखकांना निवेदन
- वर म्हटल्याप्रमाणे जर शक्य असलं तर (किंवा नसलं तरीही) आपण एक विशिष्ट दिवस ठरवून (उदा. ०१.११.२०१३) त्या दिवशी आपलं लिखाण त्याचा विषय 'दिवाळी अंक २०१३ - लेखाचं नाव' अशा रूपात प्रसिद्ध करुया का? त्यामुळे कदाचित प्रशासकांना ते एकत्र गुंफता येईल.

- कुमार