नोव्हेंबर २२ २०१३

खरवस

जिन्नस

  • चिकाचे दूध १ कप
  • दूध पाऊण कप
  • साखर साधारण १ कप
  • वेलची पूड, केशर

मार्गदर्शन

चिकाचे दूध , दूध , साखर, वेलची व केशर सर्व एका भांड्यात एकत्र करा व ढवळा. साखर विरघळली पाहिजे. नंतर कुकर मध्ये कुकराची ताटली बुडेल इतके पाणी घाला व सर्व एकत्रित केलेले मिश्रणाचे भांडे कुकरामध्ये ठेवा व त्यावर झाकण ठेवा. नंतर कुकराचे झाकण लावून शिटी काढा. अर्धा तास मंद आचेवर हे मिश्रण शिजू देत. आता गॅस बंद करा. कुकर गार झाला की मिश्रणाचे भांडे बाहेर काढा. खूप गार झाल्यावर वड्या पाडा. वड्या खाऊन जर उरल्या तर त्या शीतकपाटात ठेवा.

साखरेचे प्रमाण साधारण एक कप  असे दिले आहे तरी प्रथम अर्धा कप  साखर घालून ढवळून मग चव पाहावी. व नंतर परत आवडीप्रमाणे साखर घालावी. खरवस  अगोड  चांगला लागत नाही. चिकाचे दूध पहिल्या दिवशीचे असेल तर दूध पाऊण प्रमाणात घ्यावे . चीक दुसऱ्या दिवशीचा असेल तर चिकाच्या दुधाच्या निम्मे साधे दूध घ्यावे. पहिल्या दिवशीच्या चिकाच्या वड्या छान पडतात. गूळ घालणार असाल तर जायफळ घालावे.

टीपा

चीक शीतकपाटात टिकतो, त्यामुळे तो लगेच केला नाही तरी चालतो.

माहितीचा स्रोत

सौ आई

Post to Feedमाझा अनुभव....
छान
ओला नारळ, हळदीचे पान...
थोडे वेगळे
उष्णता
वा !
मस्तच
वासरू
दूध, चिक आणि नवजात अर्भकाचा हक्क

Typing help hide